SPARK- 2017 : Life Changing Residential PD Camp for 5-12 th std. students. (At Prayas, Amravati - from 16 th April 2017)
Pl. download the brochure & Reg. form from the links at the end of page.
तुमच्या मुलांनी जीवनात आजवर जे काही मिळविलेले आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त मिळविण्याची क्षमता व उर्जा त्यांच्यामध्ये आहे; पण ती बरीचशी अव्यक्त स्वरूपात (सुप्तावस्थेत) आहे व काही तर अज्ञातसुध्दा आहे. त्यांच्यामधील या प्रचंड प्रमाणात दडून असलेल्या व आतापर्यंत न वापरलेल्या अव्यक्त ऊर्जेचा उपयोग, त्यांचे स्वत:चे व समाजाचे जीवन समृद्ध करण्यासाठी होऊ शकतो. गरज आहे ती फक्त एखाद्या ठिणगीने हि ऊर्जा चेतविण्याची ! म्हणजेच एका स्पार्कची ! ही ठिणगी पडून या ऊर्जेने पेट घेतला की झाले ! जीवनाच्या गाडीने गती पकडलीच म्हणून समजा. अशी ठिणगी टाकून, या उन्हाळी सुट्यांमध्ये तुमच्या मुलांमध्ये असलेली ही अव्यक्त ऊर्जा सृजनात्मक व सकारात्मक पद्धतीने चेतविण्यासाठी स्पार्क 2015 हे शिबिर !
जिंकण्यासाठी स्वत:ला तयार करण्यासाठी आपल्या गुणांचा, शक्तिस्थानांचा व क्षमतांचा सतत शोध घ्यावा लागतो, त्यांना प्रयत्नपूर्वक विकसित करावे लागते; तर दोषांना ओळखून जाणीवपूर्वक दूर करावे लागते. स्पार्क 2017 शिबिरामध्ये सहभागी शिबिरार्थींना प्रत्यक्ष अनुभवाद्वारे, जिंकण्यासाठी स्वत:ला घडविण्याच्या मार्गावर अग्रेसर होता येईल.
शिबिरार्थींना विचार करायला प्रवृत्त करणारे, आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारे, जाणिवा व संवेदनशीलता तीक्ष्ण करणारे हे कृतिपर संस्कारशील शिबिर आहे. आज सर्वत्र चालू असलेली मार्कांची स्पर्धा व शर्यतीला पूर्णपणे बाजूला सारून जिंकण्यासाठी स्वत:चा शोध घेण्याचा हा आनंददायी उपक्रम आहे. सर्वत्र होणार्या व्यक्तिमत्व विकास शिबिरांपेक्षा या शिबिराचे स्वरूप खूपच वेगळे असेल.
शिबिराचे स्वरुप : फार टाईट वेळापत्रक वा जाचणारी शिस्त नसेल. सकाळी ७-११ या वेळात ठरलेली सत्रे होतील. संध्याकाळचा पूर्ण वेळ प्रत्यक्षात विविध असाईनमेंटस् पूर्ण करण्याचा असेल. दुपारचा पूर्ण वेळ वाचन, खेळ, मुक्त चर्चा यासाठी असेल. प्रत्यक्ष कृतिपूर्ण अनुभव देणार्या विविध असाईनमेंट्स शिबिरार्थीं स्वत: पूर्ण करतील व त्या प्रत्येक असाईनमेंट्मधून काय शिकलेत यावर चर्चा व विश्लेषणद्वारा विचारांची स्पष्टता व प्रगल्भता आपोआपच येईल.
शिबिराचा उद्देश :

- शिबिरातून घरी परतलेल्या आपल्या मुलांमध्ये स्पष्टपणे जाणवेल याप्रकारचे वर्तन परिवर्तन झालेले पालकांना दिसेल. तसेच अनेक बाबतीत त्यांच्यामध्ये वैचारिक स्पष्टता पण वाढलेली दिसेल.
- आयुष्याचे ध्येय कसे ठरवावे, करिअर कसे व कोणते निवडावे, ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी स्वत:ला कसे तयार करावे?
- स्वत:च्या गुण-दोषांचा शोध कसा घ्यावा, गुणांचे संवर्धन व दोषांचे निराकरण कसे करावे ?
- मानसिक बळ व आत्मविश्वास कसा वाढवावा ? वेळेचे सुयोग्य व्यवस्थापन कसे करावे ?
- वाचन, डायरी लेखन, मुलाखती घेणे आहार, व्यायाम विषयक संकल्पनांबाबत स्पष्टता येण्यासाठी प्रात्यक्षिके पुस्तके विकणे, आपल्यापेक्षा गरजू व दु:खी लोकांचा शोध घेणे, विविध संस्था व उपक‘मांना भेटी..
!–sidebar>!–sidebar>
|
|